Hosea 12

1एफ्राईम वारा जोपासतो,
आणि पूर्वेच्या वाऱ्याचा पाठलाग करतो,
तो सतत लबाडी आणि हिंसा वाढवतो,
तो अश्शुरांशी करार करतो,
आणि मिसरात जैतूनाचे तोल घेऊन जातो.
2परमेश्वराचा वाद यहूदाशी आहे.
आणि तो याकोबास त्याच्या कृत्याचे शासन करील.
त्यांचे प्रतिफळ त्यास मिळेल.

3गर्भात असता यहूदाने आपल्या भावाची टाच घट्ट धरली,

आणि तरुणपणी देवासोबत झोंबी केली.
4त्या स्वर्गदूताशी झोंबी केली, आणि जिंकला,
त्याने रडून देवाची करुणा भाकली,
तो बेथेलास देवाला भेटला,
देव तेथे त्याच्याबरोबर बोलला.

5“यहोवा” सेनाधीश परमेश्वर,

ज्यांचे स्मरण परमेश्वर नावाने होते.
6म्हणून तू आपल्या देवाकडे वळ,
विश्वासू आणि न्यायी राहून त्याचा करार पाळ,
आणि तुझ्या देवाची निरंतर वाट पहा.

7व्यापाऱ्याच्या हातात खोटे तराजू आहेत,

फसवेगिरी करण्याची त्यांना आवड आहे.
8एफ्राहम म्हणाला, “मी खरोखर धनवान झालो आहे,
माझ्यासाठी संपत्ती मिळवली आहे.
माझ्या सर्व कामात त्यांना अन्याय दिसला नाही,
ज्यामध्ये माझ्यात पाप आढळते.”

9मी परमेश्वर तुझा देव, जो मिसर देशापासून तुझ्याबरोबर आहे,

नेमलेल्या सणाच्या दिवसाप्रमाणे
मी तुला पुन्हा तंबूत वसविणार.
10मी संदेष्टयांनी बोललो आहे.
आणि त्यांना मी पुष्कळ दुष्टांत दिले आहेत
मी त्यांना संदेष्ट्यांद्वारे दाखले दिले आहे.

11जर गिलादामध्ये दुष्टता असली

तर निश्चितच लोक नालायक आहेत.
गिलादात ते बैल अर्पितात,
त्यांच्या वेद्यांची संख्या शेतातील तासामध्ये असलेल्या दगडाएवढी आहे.
12याकोब अरामाच्या मैदानात पळून गेला.
इस्राएलाने बायकोसाठी चाकरी केली
आपल्या पत्नीसाठी मेंढरे राखली.

13परमेश्वराने एका संदेष्ट्याद्वारे मिसरातून इस्राएलास बाहेर काढले,

आणि संदेष्ट्याद्वारेच त्यांची काळजी घेतली.
एफ्राईमाने परमेश्वराचा क्रोध अत्यंत चेतवला आहे.
म्हणून त्याचा धनी त्याच्या रक्तपाताचा दोष त्याच्यावर आणिल
आणि त्याच्या लज्जास्पद कामाची त्यास परतफेड करील.
14

Copyright information for MarULB